Welcome To B.A.Marathi
अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय ,अकोले . ता. अकोले. जि . अहमदनगर .
महाविद्यालयातील
मराठी विभागाची स्थापना
इ. स. १९७४
साली झाली . मराठी विशेष
विषयाची सुरवात १९७५
मध्ये झाली .
सद्यस्थितीला विभागामार्फत
मराठी विषय कला शाखेतील बी. ए., एम. ए. या वर्गा व्यतिरिक्त बी. कॉम. व बी.
एस्सी या वर्गाना देखील शिकविला जात आहे. विभागात एकूण ०६ प्राध्यापक कार्यरत आहेत . यापैकी डॉ . भास्कर शेळके
महाविद्यालयात प्राचार्य
पदावर कार्यरत असून डॉ.
रंजन कदम विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त डॉ. सुनिल घनकुटे, डॉ. विजय काळे, प्रा. कोमल गडाख ,प्रा.राहुल कासार आदि. प्राध्यापक म्हणून
कार्यरत आहेत.
मराठी विभागामार्फत वर्षभर विद्यार्थ्यांच्या
कला गुणांना वाव देण्यासाठी मराठी पंधरवाडा, मराठी भाषा दिनानिमित्त कला महोत्सवाचे आयोजन केले जाते व मराठी भाषेचे
संवर्धन करण्याचे काम विभागामार्फत केले जात आहे. तसेच स्पर्धा परीक्षेच्या
अनुषंगाने विभागामार्फत मराठी व्याकरण कोर्स सुरू करण्यात आलेला आहे याचा फायदा
अनेक विद्यार्थ्याना झालेला दिसून येतो. विभागातील अनेक माजी विद्यार्थी उच्च
पदावर कार्यरत आहेत. माजी विद्यार्थी मेळाव्या मार्फत विद्यार्थी मराठी
भाषेचे संवर्धन व विकास करण्याबाबत चर्चा करतात.